ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
15-09-2024
Gadchiroli News: चंद्रपूर आगाराला दहा इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्याआहेत. या बसेस चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना इलेट्रिक बसमध्ये बसण्याचा आनंद उपभोगता येत आहे. मात्र गडचिरोली आगारालाही लवकरच इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत.
इलेक्ट्रिक बसेससाठी अतिशय महत्त्वाचा भाग असलेला चार्जिंग स्टेशन निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. डिझेल वाहनांमुळे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यात राज्यभरात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बसेस निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जशा बसेस तयार होत आहेत. तसा पुरवठा केला जात आहे. नुकताच चंद्रपूर आगाराला 10 बसेस मिळाल्या.
या बसेस गडचिरोलीला येत आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना इलेक्ट्रिक बसमध्ये बसण्याचा आनंद लुटता येत आहे. या बसचे विशेष म्हणजे बस सुरू झाली तरी कोणताही आवाज येत नाही. त्यामुळे आपण एखाद्या महागड्या वाहनामध्ये बसलो की काय, असा आनंद मिळतो.
इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता येत असला तरी या बसेस आपल्या जिल्ह्यातील आगाराच्या नाहीत, अशी थोडी खंत प्रवाशांच्या मनाला वाटत असते. मात्र ही खंत लवकरच दूर होणार आहे. गडचिरोली आगाराला लवकरच इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. इलेक्ट्रिक बसेसला चार्जिंग करणे अतिशय आवश्यक आहे. चार्जिंग हेच या वाहनांचे इंधन आहे. त्यामुळे गडचिरोली आगारात चार्जिंग स्टेशन निर्मितीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
गडचिरोली विभागाला 50 बसेस देण्याचे नियोजन आहे. त्यांपैकी काही बसेस पहिल्या टप्प्यात उपलब्ध होतील. गडचिरोली आगारात चार्जिंग स्टेशन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच बसेस येतील, अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण इलेक्ट्रिक बसेस एसीयुक्त आहेत. त्यामुळे तिकीटसुद्धा महाग असणार आहे. गडचिरोली -चंद्रपूरची सर्वसाधारण ब तिकीट 125 रुपये आहे. तर इलेक्ट्रिक बसचे तिकीट 180 रुपये एवढे आहे. त्यामुळे या बसने प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला खार लागणार आहे. मात्र बसमध्ये एसी आहे, आरामदायक सीट आहेत, आवाजाची समस्या नाही. याबाबी लक्षात घेतल्या तर प्रवास आरामदायक होणार आहे. त्यासाठी थोडेफार अधिकचे पैसे मोजण्यास काहीच हरकत नाही.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments