STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
22-04-2024
Gadchiroli News : तालुक्यातील पोर्ला परिसरात असलेल्या हत्तींनी आता आपला मोर्चा दिभना परिसरात वळविला आहे. मागील दोन दिवसांपासून दिभना परिसरातील पिकांचे हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. दरम्यान, शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर रानटी हत्ती पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्तीसगड राज्यातून आलेल्या हत्तींनी आरमोरी तालुक्यात बरेच दिवस बस्तान मांडले होते. त्यानंतर ते पोर्ला परिसरात पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी रात्री चुरचुरा जंगलमार्गे दिभनाच्या जंगलात प्रवेश केला. मागील दोन दिवसांपासून ते मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान करत आहेत. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.
दिभना, खरपुंडी, जेप्रा परिसरात कठाणी नदीच्या किनाऱ्यावर अनेक वीटभट्ट्या आहेत. इतरत्र पाणी मिळत नसल्याने हत्ती नदीपात्रात पोहोचतात. वीटभट्ट्यांवरील मजूर रात्री त्याच ठिकाणी थांबून काम करतात. रात्रीच्या सुमारास हत्तींचे आगमन झाल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे मजुरांनी सतर्क राहावे व रात्री वीटभट्टीवर थांबू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वीटभट्टी मालकांनी आपल्या मजुरांना वीटभट्टीवर थांबू देऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप जॉइन व्हा। जॉइन होण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा. 👇👇
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments