अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
21-04-2024
Amravati News : चांदूर बाजार बोराळा गावानजीक दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून ठार झाले. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.
शरद प्रभाकर जनबंधू (45, रा. अमरावती) व पंकज प्रभाकरराव कडू (35, रा. बेसखेडा) अशी मृतांची नावे आहेत. शरद जनबंधू हे ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्यात चालक या पदावर कार्यरत होते. त्यांची नाईट ड्युटी संपवून ते पोलिस अधीक्षक कार्यालयात टपाल दिल्यानंतर अमरावती येथील आपल्या घरी जाणार होते. त्याकरिता ते MH 27 - DG 5332 क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते.
मूळचे बेलोरा (ता. चांदूर बाजार) येथील शरद जनबंधू हे सैन्यात होते. निवृत्तीनंतर ते ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेतपंकज प्रभाकरराव कड्डू (35, रा. बेसखेडा) हे दुचाकीने (MH 27- CD 3385) आपल्या आईला अमरावती येथील हॉस्पिटलमध्ये सोडून गावाकडे जात होते. या दोघांच्या दुचाकींची तालुक्यातील बोराळा गावाजवळ समोरासमोर धडक झाल्यामुळे दोघेही गाडीवरून खाली फेकल्या गेले. अपघातात दोन्ही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments