CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
21-04-2024
Nagpur News : विवाहबाह्य संबंधातून विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणीवर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश (36) असे मृताचे नाव आहे. आकाश एका सरकारी महाविद्यालयात कार्यरत होता. मे 2019 मध्ये त्याचे लग्न झाले. कुटुंबात पत्नी, मुलगी आणि आई-वडील होते. ऑगस्ट 2021 मध्ये, त्याचे सोनिका (बदललेले नाव) सोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आकाशचे कुटुंबीय तिच्या घरी गेले. आकाशसोबत संबंध ठेवून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू नको, असा त्यांनी सल्ला दिला.
सोनिकाने ही गोष्ट आकाशला सांगितली व त्यावरून त्याचे कुटुंबीयांशी वाद वाढू लागले. तो सोनिकावरच पैसे खर्च करू लागला व तिच्यासाठी त्याने कर्जदेखील घेतले होते. 2023 मध्ये मुलीचा वाढदिवस असल्याने आकाशसोबत त्याची पत्नी खरेदीला गेली होती. त्यावेळी सोनिकाने फोन करून तू माझे घर उद्ध्वस्त केले व पत्नीसोबत फिरतो आहेस असे म्हणत त्याला शिवीगाळ केली. यानंतर आकाश तणावात राहू लागला.
सततच्या भांडणामुळे त्याची पत्नीदेखील माहेरी गेली. 16 एप्रिल रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने सोनिकाने प्रेमाचे खोटे आश्वासन देऊन फायदा घेतल्याचे नमूद केले. हुडकेश्वर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments