नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
04-11-2024
Ration Card News: रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आली आहे. जर तुम्ही सरकारी रास्त भाव दुकानातून धान्याचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. केंद्रातील मोदी सरकारने धान्य वितरणाच्या नियमांमध्ये काही बदल केले असून हे बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होत आहेत.
नवीन नियमांनुसार, गहू आणि तांदूळ आता समसमान वाटप केले जाणार आहे. याआधी रेशन कार्ड धारकांना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मिळत होते, परंतु आता एका व्यक्तीसाठी 2.5 किलो गहू आणि 2.5 किलो तांदूळ देण्यात येईल. यामुळे तांदळाचे प्रमाण अर्धा किलोने कमी होणार आहे, तर गव्हाचे प्रमाण अर्धा किलोने वाढणार आहे.
ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी हा बदल लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, कारण अनेक ठिकाणी गव्हाचे सेवन अधिक प्रमाणात होते. याशिवाय, अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी देखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यांना आता 18 किलो तांदूळ आणि 17 किलो गहू देण्यात येईल, याआधी 20 किलो तांदूळ आणि 14 किलो गहू मिळत असे.
या नव्या नियमानुसार रेशन वितरणात तांदूळ कमी आणि गहू वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, पण एकूण मिळणाऱ्या धान्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंत्योदय रेशन कार्डधारकांना दरमहा 35 किलो धान्य आणि 1 किलो साखर मिळत राहणार आहे. या महिन्याच्या रेशनपासून हे नवीन नियम लागू होतील, त्यामुळे रेशन घेणाऱ्या सर्व धारकांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे.
रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेकांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments