STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
09-09-2024
DA Hike Central Government Employees: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जुलै 2024 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे 53% महागाई भत्ता दिला जाईल. ही वाढ एआयसीपीआय निर्देशांकाच्या (AICP-IW) जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारीवर आधारित असेल. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
महागाई भत्त्याच्या वाढीसोबतच केंद्र कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. ही थकबाकी जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यांची असेल. वाढ झालेला महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्याच्या पगारात दिला जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
महागाई भत्त्याची अधिकृत घोषणा 25 सप्टेंबर 2024 रोजी होऊ शकते. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत अजेंड्यावर महागाई भत्ता वाढीचा विषय असून, फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे.
सातवा वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेट फायदा मिळेल. याशिवाय, पेन्शनधारकांनाही 3% वाढलेला महागाई भत्ता दिला जाईल, ज्यामुळे त्यांच्याही उत्पन्नात वाढ होईल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments