अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
30-09-2024
Gadchiroli News: गत तीन वर्षांत प्रथमच रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोली शहराची सीमा रविवारी ओलांडली. दुपारी मसली परिसरात व सायंकाळी वाकडी आणि सेमाना देवस्थानच्या मध्यवर्ती जंगलात हा कळप दिसून आला. त्यामुळे वनविभाग आणि हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली.
मागील आठ दिवसांपासून या रानटी हत्तींचा कळप पोर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता. या काळात नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुऱ्हाडी या भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी या कळपाने गोगावलगतच्या नागोबा देवस्थान परिसरात पीक तुडवले. त्यानंतर रात्री खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटोला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिरोली- धानोरा मार्ग ओलांडला.
टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पोटेगाव मार्गाच्या दिशेने मसली गावात गेला. रविवारी दुपारपर्यंत हा कळप याच भागात होता, आणि सायंकाळी त्यांनी सेमाना उद्यान ते वाकडी फाट्याच्या मधल्या जंगलातून चामोर्शी मार्ग ओलांडला. हत्तींचा रोख मुडझा गावाच्या दिशेने होता. वनविभागाच्या पथकाने हत्तींच्या हालचाली पाहून वाहतूक बंद केली आणि नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेची सूचना दिली.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments