नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
11-11-2024
Pini Village: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात स्थित पिनी गावातील एक अनोखी परंपरा देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या गावातील महिलांना प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. यामागील कारण आणि परंपरेच्या गाभ्यात असलेली कथा तुम्हाला थक्क करणारी आहे.
पिनी गाव, ज्याचे स्थान हिमालयाच्या कुशीत आहे, आपल्या अनोख्या परंपरांसाठी ओळखले जाते. येथील एक अत्यंत आश्चर्यकारक परंपरा म्हणजे महिलांनी विशेष दिवसांमध्ये कपडे न घालण्याची. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि आजही तेच पाळले जाते.
आश्चर्याची बाब म्हणजे, स्त्रिया प्रत्येक श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. त्याऐवजी त्या लोकरीचे कपडे घालून अंग झाकतात. येथील लोक मानतात की, जर एखादी महिला या परंपरेला पाळत नाही, तर तिच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा वाईट घटना अनुभवावी लागते.
पिनी गावातील या परंपरेमागील एक प्राचीन कथा आहे. काही शतकांपूर्वी गावात एका राक्षसाचा आतंक होता. हा राक्षस चांगले कपडे घाललेल्या महिलांना पळवून नेत असे. त्याच्या अत्याचारांपासून सुटका मिळवण्यासाठी गावातील देवतेने त्याच्या वधाची योजना केली आणि त्या राक्षसाचा संहार केला. तेव्हापासून, हि परंपरा सुरु झाली आणि श्रावण महिन्यात पाच दिवसांत कपडे घालत नाही.
त्यानंतर आता ही परंपरा बदलली आहे, परंतु अजूनही काही महिलांना ती पाळतात. आता, काही महिलाही पाच दिवस पूर्णपणे कपडे न घालता फक्त हलक्या कपड्यांमध्ये घरात राहतात. या काळात पुरुष आणि महिलां हे एकमेकांपासून वेगळे असतात. पती-पत्नी देखील या पाच दिवसांत एकमेकांना भेटत नाहीत.
हा उत्सव केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठी देखील काही नियम आहेत. या कालावधीत, पुरुष मांसाहार, मासे, दारू पिणे किंवा इतर काही अशुद्ध पदार्थांचा सेवन करू शकत नाहीत. या सणाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यासाठी बाहेरून कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्याची परवानगी सुद्धा राहत नाही.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments