बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
13-10-2024
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसेही लवकरच जमा केले जातील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, योजनेसंदर्भात आता एक नवी मोठी अपडेट समोर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोफत मोबाईल फोन दिला जाणार असल्याचे मेसेज तुफान व्हायरल होत आहेत. "लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट" या आशयाचे पोस्ट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पण या व्हायरल मेसेजच्या मागे काय सत्य आहे, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु, आता महिलांना योजनेच्या माध्यमातून मोफत मोबाईल दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. व्हायरल व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की महिलांनी मोबाईलसाठी अर्ज करावा लागेल.
मात्र, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही प्रकारे मोबाईल गिफ्ट फॉर्म जारी करण्यात आलेला नाही, तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय घेतलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. सरकारने नागरिकांना या प्रकारच्या फेक मेसेज आणि व्हिडिओंपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
महिलांनी अशा फसव्या मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही फॉर्मसाठी अर्ज करू नये.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments