CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
02-09-2024
कोंढाळा या गावात पहिल्यांदाच बैलांसोबत चक्क "घोड्याला '' घेऊन
" बैल पोळा’ साजरा करण्यात आला...!
My khabar 24 :-
कोंढाळा : दिनांक 2 सप्टेंबर २०२४ सोमवार ला बैल पोळ्याचा सण कोंढाळ्या च्या दत्त मंदिर पटांगणात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...!
सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या परंपरेनुसार चालत आलेली झडत्या पण घेण्यात आलं
आता तुम्हाला वाटत असेल की झडत्या हा काय प्रकार आहे. तर ही सम्पूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे
जी फक्त तुम्हाला विदर्भातच बघायला मिळेल
बैल पोळ्याचा सण साजरा करताना हे झडती बोलावी लागते.
आणि कोंढाळा या गावी याचे विशेष परंपरा आहे.
जी सातत्याने हजारो वर्षांपासून ही संस्कृती
कोंढाळा या गावच्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आणि झडत्या घेतल्या शिवाय तर पोळा पूर्ण होतच नाही..! हीच तर झाडीपट्टीतील खरी संस्कृती आहे.
जी आपण वर्षानुवर्षे आतापर्यंत टिकवून ठेवलं आहे..!
झडती: वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'.
झडती: बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन..गौरा पार्वती हर बोला हर - हर महादेव..!
झडती: मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच "बैल पोळा''
अशातच जर गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा या गावात बैलांसोबत घोड्याचाही समावेश झालं तर स्वर्गाहुन सुंदरच की फक्त घोड्याच कौशल्य
बघण्याकरिता कोंढाळा या गावातील हजारो लोकांची गर्दी आणि उत्सुकता अजून वाढली आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खूप छान प्रकारे हा सण या गावात पार पडलं...!
स्वप्न भंगले तरुण मंडळी फडफडले
सरकारी नोकरीसाठी वाट पाहू पाहू थकले
जागा नाही निगत म्हणून रडू रडू बसले
खोट्या भाषणाने बळी पडून माझे मतच वाया गेले
रोजगार द्या म्हणू म्हणू सगळे बेरोजगारच होऊन बसले
बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर- हर महादेव...!
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments