STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
01-08-2024
Gadchiroli News: भामरागड : अतिदुर्गम मीरगुडवंचा येथे पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून परत एका निष्पाप व्यक्तीची नक्षल्यांनी हत्या केली. ही घटना 30 जुलै रोजी रात्री घडली.
सध्या नक्षल सप्ताह सुरू असून, आठवडाभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.
लालू मालू दुर्वा (40, रा. मीरगुडवंचा, ता. भामरागड), असे मयताचे नाव आहे. तो एका पोलिस अंमलदाराचा नातेवाईक आहे. 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरू आहे.
यात पोलिस जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोट, खंडणी वसुली, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा ता. भामरागड येथे Jayaram komati Gawade ( वय 40) या आत्मसमर्पित नक्षल्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती.
त्यानतर 30 जुलै रोजी रात्री मीरगुडवंचा येथे लालू दुर्वा यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपविले. एकाच आठवड्यामध्ये नक्षल्यांनी 2 निष्पाप व्यक्तींची हत्या केल्याने परिसरात दहशतिचा वातावरण निर्माण झाला आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला. माओवादी चळवळीचा बीमोड होत आहे, त्यामुळे नैराश्येतून ते असे कृती करत आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments