STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
27-07-2023
Gadchiroli: भारताच्या "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, भारत सरकार यांचे आभासी पद्धतीने "प्रधानमंत्री किसान सन्माननिधी संमेलन" कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २७/०७/२०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र , सोनापूर, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली येथील श्रीमती नीलिमा पाटील विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान), डॉ. विक्रम एस कदम विषय विशेषज्ञ ( पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र ), श्री. पी. ए. बोटीकर विषय विशेषज्ञ ( पीक संरक्षण ), श्री. ज्ञानेश्वर वि. राठोड विषय विशेषज्ञ ( कृषी अभियांत्रिकी ), श्री नरेश पी. बुद्धेवार विषय विशेषज्ञ ( कृषी हवामान शास्त्र ), श्री एस. की. लाकडे विषय विशेषज्ञ ( उद्यानविद्या ) तसेच श्रीमती प्रतिभाताई चौधरी, प्रगतिशील शेतकरी, कोयीतूर शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद व शेतकरी बंधू- भगिनी उपस्थित होते.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन द्वारे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अंतर्गत १४ हफ्त्याचे वितरण करण्यात आले. तसेच युरिया गोल्ड -सल्फर कोटेड युरिया शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी ऑनलाइन द्वारे संबोधित करताना शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून कृषी क्षेत्र हा अर्थकारणाचा अविभाज्य घटक आहे. व त्यासाठी शेतकऱ्यांना सर्वांगीण विकासाकरिता शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सतत प्रयत्न शील आहे असे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच लाभदायक ठरेल असे सांगितले. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून आपला विकास साधावा असे प्रतिपादन केले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments