निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
28-07-2023
(सबसे फास्ट न्युज)...:
आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बघण्यासारखे पर्यटन स्थळ आहेत. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात कित्येक देवस्थान डोंगर, दऱ्या, नद्या, तलाव, धरणे आहेत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जवळचाच असलेला तलाव (धरण)याबद्दल माहिती सांगणार आहे. माहिती आवडेल तर फॉलो जरूर करा. मी आज माझ्या या लेखातून आसोला मेंढा धरण च अनुभव करून देणार आहे. तर चला मग आसोला मेंढा धरण. चंद्रपूर जिल्यात सावली तालुक्यात पाथरी या गावाजवळ आहे. आणि चंद्रपूर शहरापासून साधारण 18की.मी इतका आहे आणि सावली या तालुक्यापासून 26की.मी इतका अंतरावर आहे. आणि हा धरण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे ब्रिटिश कालीन धरण म्हणून ओळखल्या जातो.
नैसर्गिक साधन सामग्रीने संपन्न असलेला घनदाट जंगलाने व्याप्त असलेला हा धरण आहे मित्रांनो या धरणाचे बांधकाम आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी होण्यापूर्वी म्हणजे 1902आणि 1903 मध्ये धरणाचे बांधकाम सुरु झाले. आणि 1917 ते 1918 या कालावधीत धरणाचे बांधकाम पूर्ण झाले या धरणाची लांबी 1376 मिटर म्हणजेच (4516 फूट) इतकी आहे. तर सर्वात पायापासूनची लांबी 18.08 मिटर म्हणजेच (59.31फूट) आहे. आसोला मेंढा हे धरण निसर्ग सौदंर्यासाठी पर्यटकाची आकर्ष आहे. या धरणाजवळच एक गेस्ट हाऊस सुद्धा आहे.
या धरणातले पाणी समुद्रासारखेच निळा आहे. हे धरण दरवर्षी पाऊसाळ्यामध्ये खूप भरून असते. आणि ओवरफ्लो होती. व त्यामधुन धबधबे तयार होतात. या धरणाचा ओवरफ्लो बघण्यासाठी या निसर्गरम्य वातावरण जिल्यातीलच नही तर इतर जिल्यातील पर्यटक सुद्धा गर्दी करतात. तर मित्रांनो येथील निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट जंगल धरण्याच्या मधून असलेला रस्ता आणि प्राणी तसेच विविध पक्षी बघायला मिळतात.
आणि आपण इथ यायच असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे गडचिरोली पासून लहान व्याहाळ ला यायच आणि तिथून निमगाव ला जायच निमगाव वरून पाथरी साठी शॉटकट रस्ता आहे. पाथरी ला आल्यावर नास्ता चाय करून टाकायच कारण पाथरी वरून जंगल रस्त्याने जावे लागते आणि आसोला धरणाला गेल्यानंतर आपल्याला यायच मन होणार नाही कारण तिथल्या पर्यावरणात आपला मन रमून जाते आणि ओवरफ्लो धबधब्यात गेल्यानंतर वापस यायच मन होणार नाही. आणि धरणाला जाताना पेट्रोल पंप असल्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि. आसोला मेंढा खूप छान आहे आपल्या फॅमिली सोबत जहाँ.. आणि पार्टी वगरे करू शकता.. जहाँ नक्की..(prajyotweskade)
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments