नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
28-03-2024
काचबिंदू हा दबक्या पावलांनी येणारा डोळ्यांचा आजार असून, अपरिवर्तनीय अंधत्वाचे दूसरे प्रमुख कारण आहे. जगभरातील सर्व अंधत्वापैकी 12.3 टक्के प्रमाण काचबिंदू आहे. योग्य वेळी निदान व उपचार न केल्यास डोळ्याच्या मज्जातंतूवर ताण येऊन दृष्टीचे तात्पुरते व कायमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे वेळीच योग्य काळजी घ्यावी.
काचबिंदू आजारांची लक्षणे सीम्य असल्याने दीर्घकाल कळत नाहीत. त्यामुळे काचबिंदू समजून घेणे शोधणे आणि त्यावर उपचार होणे गरजेचे आहे.
काय आहे काचबिंदू आजार ? What is Glaucoma disease?
या आजारामध्ये डोळ्यांमधून मेंदूपर्यंत पोहोचवणारी डोव्याच्या मागील जी मज्जातंतू (Optic Nerve) असते. ती डोळ्यांतून मेंदूकडे दृश्य चिन्हे (Visual Signal) पोहोचविते.
त्यामुळे आपल्याला दिसण्यासाठी मदत होते. जेव्हा नेत्रमणीच्या मागच्या भागातील (Posterior chamber) मधील अतिरिक्त द्रव नेत्रमणीच्या पुढील भागात (Anterior chamber) येऊन दाब वाढवतो.
त्यामुळे मज्जातंतूवर ताण पडतो. हा तान हळूहळू वाढतो. परिणामी, मज्जातंतू क्षीण होत गेल्याने दृष्टी तात्पुरती किंवा कायमची जाऊ शकते. त्यामुळे वेळीच आपल्या डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा धोका होण्याची शक्यता असते.
डोळा हा अत्यंत संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस काचबिदू रुग्ण वाडत असल्याचे दिसून येत आहे.वेळीच निदान करून उपचारावर नियंत्रण मिळवता येते.
Screening time for mobile, TV, laptop कमी करावा. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे. तज्ज्ञांच्या परवानगीशिवाय कोणतेड़ी खूब डोळ्यात टाकू नये, तसेच यरील लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
अनुवांशिकता : Heredity
पालक किंवा भावंडांमध्ये आजार
असेल तर शक्यता वाटते, तसेच मधुमेह, कनी नंबर असलेल्या व्यक्ती, सिकलसेल अॅनिमिया, उच्च रक्तदाय, पातळयुक्त वास्त पिकलेला मोतीबिंदू या रुग्णांमध्ये काचबिंदू | होण्याची शक्यता अधिक असते.
निदान कसे होते? : What would the diagnosis be like?
९० टक्के रुग्णामध्ये अखेरच्या टप्यात निदान होते. त्यामुळे वयाच्या चाळीस वर्षानंतर दरवर्षी डोल्यांची बाहुली मोठी करून मागच्या पडद्याची (Retina) तपासणी करणे व डोळ्याचा दाब मोजणे 'आवश्यक आहे. तपासणीत शंका आढळल्यास इतर चाचण्या कराव्या लागतात. योग्य वेळी निदान झाल्याने दृष्टी वाचवता येते.
उपचार कोणते? Which treatment?
एकदा निदान झाले वर वेगवेगळ्या काचबिंदू प्रकारानुसार डोक्याचे ड्रॉप, काचबिंदू शस्त्रक्रिया (Trabulectomy) किया लेझर शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया झाल्यावरही नियमितपणे डोळ्यात ड्रॉप टाकणे आवश्यक असते.
लक्षणे सौम्य : symptoms mild
काचबिंदूची व लक्षणे इतकी सोम्य असतात की दीर्घ काळापर्यंत लक्षात येत नाहीत. त्यामुळे या आजाराला सायलेंट किलर असे म्हणतात.
काचबिंदूची लक्षणे : Glaucoma symptoms
मोतीबिंदू जास्त पिकल्याने दाब वाडून काचबिंदू होतो.
त्यामुळे प्रकाश उत्सर्जित करणाया यस्तूभोवती तेजोमंडल दिसणे, दृष्टी नष्ट होणे, डोळे लाल होऊन अस्पष्ट दिसणे, डोळ्यात वेदना होतात. सतत डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्या होणे ही लक्षणे जाणवतात.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments