RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
26-07-2024
Chandrapur :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी, कुठून समोर दिसणार, हे सांगणे अवघडच झालेले आहे. असाच एक काही होते जेंव्हा वाघाचे नाव ग्रामस्थांचा ऐकतात आणि थरकाप उडतो, तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते.
असाच काही प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आलेला आहे. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ आला आणि उभा राहिला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली.
मात्र, त्याच वेळी तिथे ST महामंडळाची बस आली. बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने समय सूचकता दाखवत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.
सध्या सर्वत्र मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील मंगरूड गावातील शेतामध्ये काम करण्यासाठी रामदास खांदेवे नामक शेतकरी सायकलने गेलेले होते.
सायंकाळी ५:३० वजताच्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा होता.
वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे, दोघांच्याही मागेपुढे कोणीच नव्हते. वाघ पाहून शेतकरी भयभीत झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात ST Bus त्याच रस्त्याने आली. बसचालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धाऊन आला.
शेतकरी आणि वाघाची नजर एमेकमेकांवर होती. तेवढ्यात मंगरुडहून गोविंदपूरकडे जाणारी ST Bus तेथे पोहोचली. बस चालकाने समय सूचकता दाखवत तत्काळ बस थांबवून वेळ न घालवता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले. त्याची सायकलही बसमध्ये घेतली. ST Bus मुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेने पळाला.
वाघ समोर असून प्राण वाचवले हा प्रकार शेतकऱ्याला एक जीवदान देणारा ठरला. ST Bus गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला या प्रकारे शेतकऱ्याचे प्राण वोचले.
वाघाला आपल्या समोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. ST Bus चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितला. वाघ आणि शेतकऱ्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
बिबट्या घरात शिरला अन्…
तळोधी बाळापूर वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) या गावांमध्ये घुसून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने सचिन रतिराम रंदे यांच्या घरात बांधून असलेल्या शेळ्यांवर हल्ला आणि त्यातील एका शेळीला ठार ही केले.
त्यानंतर बिबट्याने त्यांच्याच घरात ठाण मांडले होते. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल सहा तास प्रयत्न करण्यात आले.
अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments