ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
01-11-2024
Maharashtra Politics Live Updates Today: महाराष्ट्रात निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. अवघ्या १९ दिवसांनी महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. हा सामना कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच उमेदवार याद्या जाहीर होत असताना काहीसं नाराजीचं चित्र आहे. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीही झालेली दिसते आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यादिवशी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माहीममध्ये मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकिट दिलंय. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या आणि निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा गुजराती कँप विजयी होणार नाही-संजय राऊत
महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा गुजराती कँप यांना निवडणुकीत विजयी करायचं नाही हे जनतेने ठरवलं आहे. हा जनतेचा आत्मविश्वास आहे, अतिआत्मविश्वास नाही. तसंच मनसेला मदत करणं या मागे भाजपाचा हेतू हा फक्त शिवसेनेची मतं कापण्याचा आहे. हे त्यांचं राष्ट्रीय धोरण आहे अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
सदा सरवणकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही माहीममधून लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यांत अनेक महत्वाच्या लढती पहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माहीम येथील निवडणूक . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यामुळे तेथे मनसे वि. शिवसेना ठाकरे गट वि. शिवसेना शिंदे गट अशी बिग फाईट पहायला मिळणार आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरवल्यामुळे सरवणकर यांनी फॉर्म मागे घ्यावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र सरवणकर हे अद्याप आपल्या भूमिकेवरच ठाम आहेत. अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळे माहीमच्या जागेचा पेच भाजपासह महायुती सोडवणार का? हा प्रश्न आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments