संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
06-09-2024
गडचिरोली/ दिनांक,06 :- गडचिरोली जिल्ह्यातील अभियंता संवर्गातील मागण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील दिड वर्षांपासून अवगत करून सुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष व या संवर्गाची हेळसांड होत आहे. सेवा विषयक मागण्यांवर वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न होणे हि बाब अतिशय असंवेदनशील व अमानवीय आहे. संदर्भ क्रं 14 मध्ये नमूद मागण्यांवर मा.अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनांक 21/08/2024 रोजी संघटनेचे पदाधिकार्यांची बैठक घेतली . परंतु सभेत आमच्या मागण्यांवर कोणताही सकारात्मक दृष्टिकोन दिसुन आला नाही.निवेदनातील मागण्या सदस्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व रास्त आहेत. परंतु आपले प्रशासन एकतर्फी विचार करून शासन निर्णयाला बगल देऊन अभियंता संवर्गाची दिशाभूल करीत असल्याची माहिती दिली. जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाला अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया, चंद्रपूर येथील जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची शासन परिपत्रकानुसार लाभ दिलेले आहेत तसेच सेंट्रलच्या पाटबंधारे विभागाने तेथील अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लाभ दिलेले आहे या सर्वांचे सभेत दाखले दिल्यानंतरही सभेतील चर्चैनंतर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे दिनांक 04/09/2024 पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे. या संबंधीत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी 06/09/2024 ला भेट देऊन अभियंता संवर्गाच्या मागण्या रास्त असुन गोंदिया, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहे . आणि शासन परिपत्रकानुसार लाभ देणे आहे असे चर्चेत व त्यांच्या कडे असलेल्या कागदपत्रावरुन दिसुन येते. आणि खरोखरंच या 130 अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची पूर्तता करण्याची बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी केली. यावेळी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी गडचिरोली, मा. मंदीप भाऊ गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, मा.नरेश महाडोळे, जेष्ठ पदाधिकारी, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इंजिन. के एस. ढवळे, जिल्हा सचिव इंजि. पी.बी.झापे , कार्याध्यक्ष इंजि. इ.वाय. सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. एम.टी.रामटेके, इंजि. एस.एम. दुर्गे, इंजि. के. आर. सलामे, कोषाध्यक्ष इंजि. बी. व्ही. शेन्डे, इंजि. जी.के शिरपुरकर, इंजि. ए.एम. अगळे, इंजि. एम.पी.कावळे, इत्यादी 50 ते 60. अभियंता संवर्गाची आंदोलनात सहभागी होते. 1) एक स्तर योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता पदाचे वेतन देण्यात यावे. २) आज घडीला फक्त बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रवास देयके रु. 57.00 लक्ष प्रलंबित आहेत. सदर प्रवास देयकाची प्रतिपुर्ती वेळिच होणे गरजेचे आहे. जो पर्यंत प्रलंबित प्रवास देयकाची प्रतिपुर्ती होत नाही.तो पर्यंत कोणीही सदस्य स्वतः चे वाहनाने दौरा करणार नाहीत. कार्यालयाकडून वाहन किंवा आग्रिम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल. 3) बांधकामात अनियमितता झाल्यास फक्त कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना सम प्रमाणात जबाबदार धरण्यात यावे. 4) कनिष्ठ अभियंता यांनी झालेल्या बांधकामांचे देयक सादर केल्यानंतर उप विभाग स्तरावर उप अभियंता यांची 100 टक्के व वरिष्ठ सहाय्यक यांचे कडून गणीतीय तपासणी होवुन, संबंधित विभागास सादर करण्यात येतात, त्यानंतर विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर उप विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर वित्त व लेखा विभागात पुनश्च लेखा व वित्त विषयक तपासणी करून भुगतान केल्या जाते. यानंतरही लेखा आक्षेप निकाली काढण्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी. यापुढे या कामांकरिता कनिष्ठ अभियंते सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे नाहक मानसिक त्रास देवु नये. 5) जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जिल्हा परिषदेकडे लहान परंतु विखुरलेली स्वरुपाची कामे असल्याने प्रस्तावित बांधकामांचे अंदाज पत्रक तयार करणे, वारंवार भेटी देवून कामावर नियंत्रण ठेवणे, कामे करवून घेणे झालेल्या बांधकामांचे मापे घेणे/नोंदविणे, देयक तयार करणे इ काम करण्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावे लागते. शासनाने या सर्व कामांकरिता जिल्हा परिषदेला संगणीकृत प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रणालीचा लागु करण्यास कळविलेले आहे. सर्व विभागांना पि.एम.एस. प्रणाली तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 6) पदवी/पदविका, अर्हता धारक कनिष्ठ अभियंता यांना 3/5 वर्षे सेवेनंतर सहाय्यक/ शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. तसेच अर्हतारहित कनिष्ठ अभियंता 7/10 वर्षे सेवेनंतर शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. 7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना घरकुलाचे कामातुन मुक्त करावे. इत्यादी मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments