RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
07-10-2023
फुले महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न
वन्यजीवांचे रक्षण करा- वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांचे आवाहन
आष्टी -
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मार्कंडा( कनसोबा) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी मा.भारती राऊत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वन्य जीवनाचे रक्षण करा ,मोफत शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी वने सुरक्षित राहणे आवश्यक आहे.वन्यजीवांचे अस्तित्व हे मानवी जीवनास लाभदायकच आहे. भूतलावर मानवाप्रमाणेच प्रत्येक जीवाश्मला जगण्याचा अधिकार असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून वन्यजीवाची काळजी घेण्याचे आवाहन भारती राऊत केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.राजकुमार मुसणे, डॉ.गणेश खुणे,प्रा ज्योती बोबाटे, डॉ .भारत पांडे , डॉ.रवी शास्त्रकार ,डॉ.भारत पांडे, डॉ .रवी गजभिये, प्रा . श्याम कोरडे तथा वन क्षेत्र सहाय्यक श्री.नरेंद्र वडेट्टीवार, श्री .ईश्वर मांडवकर, प्रकाश भंडारवार ,वनरक्षक श्री हजारे, कोकनरे , श्री.आखाडे, श्री .दंडिकवार , श्री.गोवर्धन, श्री . बारर्शिंगे ,क्षेत्रीय लिपिक कोवे प्रिया नागापुरे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वन्यजीवनाच्या संरक्षणाकरिता जनजागृती करण्यासाठी जनजागृती रॅलीचे ही आयोजन करण्यात आले. सदर रॅलीत पोलीस निरीक्षक माननीय कुंदनजी गावडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, प्रा .राजकुमार मुसणे, प्रा . ज्योती बोबाटे तथा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. जनजागृती रॅलीतून नागरिकांना वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी सर्व नागरिकांनी वन्यजीवांचे रक्षण करण्याविषयी आवाहन केले.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments