समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
05-10-2023
जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
गडचिरोली, (जिमाका) दि.05 : जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण 111 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्य 3 ऑक्टोबर 2023 च्या आदेशान्वये माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 6 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ) 16 ऑक्टोबर (सोमवार) ते 20 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) 23 ऑक्टोबर (सोमवार) रोजी सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ 25 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 25 ऑक्टोबर (बुधवार ) दुपारी 3 वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) (गडचिरोली जिल्हयासांठी स.7.30 वा.पासून ते सायंकाळी 5.30 वा.पर्यंत) आणि मतमोजणीचा 7 नोव्हेंबर 2023 (मंगळवार) रोजी होईल.
तरी वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी/नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून आवाहन करण्यात येत असल्याचे निवडणूक विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.
*अशी आहे निवडणूक होणा-या (सार्वत्रिक / पोट) ग्रामपंचायतींची संख्या* : कोरची – 17 ग्रामपंचायती, कुरखेडा – 4, देसाईगंज – 1, आरमोरी – 1, गडचिरोली – 6, धानोरा – 26, चामोर्शी – 7, मुलचेरा –4, अहेरी - 6, ऐटापल्ली – 13, भामरागड – 14 आणि सिरोंचा तालुक्यातील 12 अशा एकूण 111 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक / पोट निवडणूक होणार आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments