ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
04-10-2023
अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.
गडचिरोली:- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कार्यवाही
करण्यात यावी; यासाठी सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज (वडसा) येथे दोनदा आमरण उपोषण केला होते. दोनदा आमरण उपोषण करूनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा संबंधितांवर कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत तिसऱ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग सत्यवान रामटेके यांनी अवलंबिला आहे.
त्यानुसार त्यांनी २५ सप्टेंबर २०२३ पासून मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केला आहे. आजचा नववा दिवस असून सदर गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांना आमरण उपोषण कर्त्याशी कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते मागण्यांकडे दुर्लक्ष करून रामटेके यांच्या मृत्यूची वाट बघत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.
एवढे दिवस लोटूनही मागण्या मान्य न करणे म्हणजे काही तरी झांगडगुत्ता असल्याचे वाटत आहे. वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार करूनही दोषींवर कार्यवाही न करता; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय वा दिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments