समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
04-10-2023
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील आरोग्य केंद्रात जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ९ उपकेंद्र आणि ४४ गावातील गरोदरमाता व लहान बालकांची तसेच वयोवृद्ध नागरिकांचीसुध्दा तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील ५०० तालुके व गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. या अभियानात गरोदरमातांची नोंदणी व १२ आठवड्याच्या आत नोंदणी करणे, संस्थात्मक प्रसूती १०० टक्के करणे व बालकांचे वजन २.५०० च्या वर आणणे व कुपोषणमुक्त करणे, क्षय रुग्णांची तपासणी करून उपचार करणे, ३० वर्षांवरील नागरिकांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी करून उपचार करणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी गरोदर मातांची नोदणी करून त्यांना आम्ही 'माहेर घर' या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता व मातेसोबत राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भोजन, राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या भागात मलेरियाचे प्रमाण अधिक असून आशासेविकांना रक्ताचे नमुने घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमात उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, उपनिरीक्षक सचिन सरकटे, प्रशांत डगवाल, अभिजित काळे, जमदाडे, मुणाल उसेंडी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी प्रगती टाक, सरपंच राजेश्वरी बोगामी, आरोग्य साहाय्यिका पेंदाम, आशासेविका वैशाली मोगरे, आरोग्यसेवक सुनील सिडाम, आरोग्य साहाय्यक पी. पी. सिडाम, धोटे, सूरज येगोलपवार तसेच लाहेरी परिसरातील आशा, अंगणावाडीसेविका, आरोग्यसेविका व गरोदरमाता, गावकरी उपस्थित होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments