नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
03-10-2023
सिरोंचाचे तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर .
सिरोंचा :- तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान मागील जून महिन्यापासून थकीत आहे,
ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही करिता थकीत असलेले अनुदान तात्काळ लाभार्त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी केली आहे.
सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या वतीने त्यांनी सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
सिरोंचा तालुक्यात गोरगरीब, वृद्ध, अपंग, विधवा,अनात मुले /मुली ,दुर्धर आजार,असे निराधारांचे देय असलेलं संजय गांधी निराधार योजनेचा अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावी,मागील जून महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांच्या कुटुंबावर उपास मारीची पाळी आली आहे,
सदर अनुदान हे एकूणच महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांचे थकीत असल्याची माहिती आहे ,अशात महाराष्ट्रातील लक्षावधी लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्याचे सर्व लाभार्थ्यांची गैरसोय होत असताना दिसून येत आहे,
यावर शासनाने गंभीरतेने लक्ष घालून संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ देय असलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी ,अशी मागणी शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यारपवार ,तालुका अध्यक्ष फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला, याचासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस - चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला,राष्ट्रवादी कार्यकर्ते सडवली मेडीजेर्ला,विनोद नायडू,राजू मूलकला,अंकुलू मेडीजेर्ला यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments