संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
03-10-2023
अविकसित व अतिसंवेदनशील भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी कडून छोटीशी भेट
भामरागड
पोलीस स्टेशन धोडराज येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी ग्राम भेट एस.आर. पी. व सी.आर.पी.हद्दीतील अविकसित अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट देत असतात. व शाळेतील गरजू गरीब विद्यार्थ्यान सोबत नेहमी संपर्क करतात. व तेथील शिक्षकांशी समन्वय साधून आपण विद्यार्थ्यांकरिता काय करू शकतो या संदर्भात वार्तालाप करत असतात. त्यामध्ये शाळेत विद्यार्थी ज्ञान घेत आहेत परंतु त्यांना दप्तर,नोटबुक, शाळेत नाही याची खंत पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी नेहमी सतावत होती. म्हणून त्यांनी निश्चय केला की विद्यार्थ्यांना भेट म्हणून दप्तर व नोटबुक द्यायचे. म्हणून धोडराज पोलीस स्टेशन हद्दीतील भटपर,बोळगे,गोंगवाडा, मर्दमालेंगा,परायणार,व मिडदा पल्ली, या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 60 दप्तर 120 नोटबुक व 150 शालेय साहित्याचे स्वखर्चाने वाटप केले.
अशा प्रकारे अतिसंवेदनशील भागात कर्तव्य करून गरीब विद्यार्थ्यांकरिता जीव ओतून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पालकांनी व शिक्षकांनी सुद्धा व गावकऱ्यांनी आभार मानले. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडी-अडचणी व लागणाऱ्या साहित्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments