नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
23-09-2023
चामोर्शी तालुक्यातील - जयरामपुर या गावातील सोयाबीन पिकावर मोठया प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने सोयाबिनपिक मातीमोल झाले आहे. यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जयरामपूर येथील शेती बारमाही उत्पन्न देणारी आहे. अति पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून कितीही वेळा रोगावर फवारणी करून सुद्धां प्रामुख्याने रोगावर नियंत्रण येत नाही. यामुळे सोयाबीन पिक आपल्याला होणार किंवा नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सोयाबीनचे उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा बजेट विस्कळीत झालेला आहे. आता शेतकऱ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय एकही पर्याय राहिलेला नसल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.
मोठया प्रमाणात किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरीवर्ग दुविधेत सापडला असून नेमके
करावे तरी काय अशी विवंचना त्याला लागली आहे. बिजाईचा खर्च, खताचा खर्च करून सुद्धा आपल्याला निराशाच पदरी पडेल असे शेतकऱ्यांना वाटु लागले आहे. शेतकऱ्याला योग्य ती सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परीसरातील सर्व शेतकरी तसेच शेतकऱ्याच्या पाटील शेतकऱ्याच्या पाठीशी असलेले जैरामपुर या आहे. गावातील माजी उपसरपंच हरेश निखाडे करीत
आहेत. शेतकरी उत्कृष्ट गट जैरामपुर येथील अध्यक्ष संतोष एकनाथ गौरकर, सचिव अनिल गौरकर व सर्व सदस्य शेतकरी यांनी गावातील सोयाबीन या मालाची नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा माजी सरपंच निखाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments