ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
07-08-2024
कुनघाडा रैय्यतवारी जि. प. शाळेत शिक्षण परिषद संपन्न
केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले
दिनांक-०७/०८/२०२४ रोज बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे केंद्रस्तरीय 'शिक्षण परिषद' पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते होते , तर कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु. शेंडे मॅडम, सुत्रसंचालन प्रमोद बोरसरे, तर आभार प्रदर्शन दुधबावरे सर यांनी केले. या परिषदेची सुरुवात फुलोरा परीपाठाने करण्यात आली. सुलभक निमाई मंडल यांनी बाबळेवाडीचा अनुभव सांगीतला तर अध्ययन स्तर विश्लेषण, कृतिकार्यक्रम व नियोजन व अंमलबजावणी रोषण बागडे व टिकेश ढवळे, शिष्यवृत्ती सद्यस्थिती व आढावा विजय दुधबावरे व निमाई मंडल, PAT विद्या समिक्षा केंद्र विद्याप्रवेश - आशिष येलेवार व उमेश जेंगठे, निपुण भारत ध्येय आणि क्षेत्र प्रफुल सिडाम, पुरुकातील कोऱ्या पानाचा प्रभावी वापर, आनंददायी शनिवार येलेवार सर यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख गोमासे यांनी केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन व सर्व शंकाचे समाधान केले. या शिक्षण परिषदेत शिक्षकांना पडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण सुलभकाकडून करण्यात आले.
'श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहिकडे'
अशा उत्साहपूर्ण व निसर्गरम्य वातावरणात केंद्राची पहिली शिक्षण परिषद पार पडली.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments