STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
06-08-2024
काल जखमी केलेल्या घोडीला आज वाघाने केली फस्त
चिमूर तालुक्यातील खडसंगी बीट परिसरात शेतातील पाळीव गरोदर घोडीची शिकार वाघाने रोज सोमवारी केली होती. परंतु ती गोडी जखमी अवस्थेत असताना तिला रस्त्या अभावी घरी आणता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास त्या जखमी घोडीला वाघाने फस्त केले. त्यामुळे शेतकरी हेमंत इसनकर यांचे वाघाच्या भीतीने शेतकाम थांबून झालेले नुकसान व घोडीचे नुकसान असे एकूण 1,00,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
हेमंत इसनकर यांचे शेत मुरपार रीठ खापरी पिंजारी येथे असून रस्त्या अभावी या शेतात मालाची व मजुराची ने आण करण्याकरता त्यांनी घोडी पाळलेली होती. दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान शेताच्या बांधावर चरण्यासाठी बांधलेल्या गरोदर घोडीवर वाघाने हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात घोडी गंभीर जखमी झाली होती रस्त्या अभावी या घोडीला बैलबंडी किंवा इतर वाहनाने मांडून घरी आणता आले नाही. त्यामुळे ती घोडी त्याच ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच वाघाने डबल हल्ला करून घोडीला फस्त केले. शेतीचे कामे करण्यासाठी वरदळी करता या घोडी चा उपयोग करीत असल्याने त्यांचे शेतीचे सर्व काम ठप्प पडले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील वाघाने याच शिवारात याच घोडीच्या नवजात शिंगरू (पिल्लू) ची शिकार केली होती, त्यामुळे देखील त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
या परिसरात वाघाने घोडीची शिकार केल्याची चर्चा सर्व परिसरात पसरली असून त्यांच्या शेतात कोणताही मजूर सध्या घडीला काम करण्यासाठी येण्यास तयार नाही. हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून काही भागात भाताची पेरणी शिल्लक आहे. तसेच इतर पिकांची मशागत देखील करणे आवश्यक आहे. मात्र वाघाच्या भीतीने मजूर शेतात येण्यास तयार नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांनी झालेली नुकसान एक लाख रुपये लवकरात लवकर मिळण्यात यावी व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना केली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments