समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
06-07-2024
अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु
काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
देसाईगंज-
अतिदुर्गम,आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ व व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने पावसाच्या दिवसात वाहनांना अपघात होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे यथाशिघ्र बुजविण्यात यावेत,अन्यथा बेशरमाची झाडे लावुन तीव्र निषेध करण्याचा इशारा काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिला असता अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
देसाईगंज शहर हे लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. देसाईगंज वरून अलिकडे सुरजागड लोह खनिजाची वाहतुक वाढल्याने तसेच व्यापार नगरी असल्याने खरेदीसाठी लगतच्या जिल्ह्यातुन येणारांचा मोठा ओघ आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस असुन पडलेल्या खड्ड्यात पाणी साचुन राहात असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही.यामुळे वाहनांना अपघात घडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली होती.
जड वाहनांची वर्दळ त्यातच बारमाही जड वाहतुक होत असल्याने एकदा डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराला सदर मार्गाची देखभाल दुरस्ती करणे आवश्यक आहे.मात्र डांबरीकरण करतांना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने डांबरीकरण उखडून मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत.यात नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गासह राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश असल्याने व सदर बाब नगर प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याने मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन यथाशिघ्र खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावावेत,अन्यथा विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतिने पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी बेशरमाची झाडे लावून तीव्र निषेध करण्याचा इशारा डाॅ.चिमुरकर यांनी संबंधितांना दिला होता.याची दखल घेत मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन डाॅ.शिलु चिमुरकर यांचे आभार मानले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments