संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
04-07-2024
महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये
बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?
चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत फार्म भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे तर एकमेकींना महिला तू लाडकी बहिणचा फार्म भरली का ? असे विचारत आहेत तर आष्टी शहरात व परिसरात सलून दुकानात, पानटपरीवर पुरुषांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुरुष वर्ग एकमेकांना म्हणतात की सरकार लाडकी बहिण योजना चांगली काढली आहे माझी बायको तर मला सरकार माझा भाऊ मला महिन्याला १५०० रुपये देणार आहे म्हणून मस्त खुष आहे म्हणून सांगतो आहे तर दुसरा पुरुष म्हणतो की सरकार भाऊ बहिणीसाठी चांगली योजना काढली पण आम्हाला (भाऊजी) म्हणून एक योजना काढायला पाहिजे अशी खमंग चर्चा सुरू आहे या होणाऱ्या चर्चेवरून सरकारच्या बहीण सरकार भाऊ वर खुष आहेत आणि भाऊजी मात्र नाराज आहेत यावरून असे दिसून येत आहे
आता तर दाखल्यांचे अटी सुद्धा कमी करण्यात आल्याचे ना.अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे व कोणताही अधिकारी या कामात कुचराई केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व सदर योजनेचा फार्म भरण्यासाठी मुद्दत वाढविण्यात आली आहे
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments