CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
02-07-2024
नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी आष्टी पोलीस ठाणे सरसावले
चामोर्शी: ब्रिटीश काळी शासनास केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रीया संहिता-१९७३ तसेच भारतीय पुरावा कायदा-१८७२ यांची निर्मीती करण्यात आली होती. काळानुसार व बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत गेले. मागील काळात भारतातील समाजिक जीवनात आमुलाग्र बदल झाल्याने तसेच भारतीय व्यक्ती हा केंद्रस्थानी आल्याने कायद्यात मोठा बदल करणे केंद्रशासनास अंत्यत महत्वाचे वाटत होते. याच कारणांने केंद्रशासनाने व्यक्ती केंद्रस्थानी ठेवुन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रीया संहिता व भारतीय पुरावा कायद्यात आमुलाग्र बदल करुन अनुक्रमे भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम- २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ तयार करण्यात आले असुन सदर कायद्याची अंमलबजावणी दिनांक ०१/०७/२०२४ रोजीपासुन पुर्ण भारत देशात लागु करण्यात आले.
नवीन कायद्याची भारतीय नागरीकांना माहीती व्हावी या उद्देशाने दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत पोलीस स्टेशन आष्टी येथे अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चासत्रकरीता पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील प्रतीष्ठीत नागरीक, व्यापारी, समाजसेवक, पोलीस पाटील, विद्यार्थी, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार व परीसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीली. भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम-२०२३ व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ च्या चर्चासत्राकरीता उपस्थितांना अजय कोकाटे उपविभिागीय पोलीस अधिकारी अहेरी, विशाल काळे पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांनी मार्गदर्शन करुन नवीन व जुन्या कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजावुन सांगितले. पोलीस स्टेशन आष्टी येथे आयोजीत चर्चासत्राला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments