निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
01-07-2024
दोटकुली गावात कृषी दिवस साजरा कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन
केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी यांच्या तर्फे ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्यांतर्फे ०१ जुलै २०२४ ला दोटकुली येथे कृषी दिवस आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. आदित्य कदम तसेच श्री. छबिल दुधबळे, श्री. प्रलय झाडे निकीता येलमुले मॅडम यांच्या मार्गदर्शनात अनुज हिंगाने, यश काले ,अजिंक्य केमये , अनुप लोणारे , गोपाल मंडल यांच्या द्वारे उत्तम रित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे चे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस १ जुलै हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरी केली जाते. अशी माहिती कृषी विद्यार्थ्यांनी दिली व कृषी दिवसा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी गावातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा दोटकुली मुखध्यापक . घोडमारे सर, टेकाम सर, गव्हारे सर, नंदाताई चौधरी आणि .गावकरी मंडळी व लहान बालगोपाल उपस्थित होते. आणि कार्यक्रम सहजरीत्या पार पडला.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments