ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
30-06-2024
आष्टी परिसरातील त्रस्त नागरिकांनी महावितरण विरोधात करणार रास्ता रोको आंदोलन
पोलीस स्टेशन आष्टी येथे त्रस्त नागरिकांनी दिले निवेदन
आष्टी: परिसरातील महावितरण विभागाची लाईट वारंवार जात असल्यामुळे ४ दिवसात लाईनची व्यवस्था सुरळीत न केल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकणार व चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे आष्टी येथील त्रस्त नागरिकानी पोलिस स्टेशन आष्टी येथील ठाणेदार विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील महावितरण विभागाच्या वतीने मागच्या वर्षी आष्टी येथील लाईट वारंवार जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. लाईट येण्या जाण्यामुळे काही नागरीकांच्या घरातील टि.व्ही. फ्रीज, कुलर, एसी. लाईट येण्या जाण्यामुळे बिघडल्या व नादुरुस्त झाल्या आणि त्यानंतर नागरिकांची नुकसान व होत असलेला त्रास पाहून महावितरण विभागाने आष्टी येथे ३० ते ४० लाख रुपये खर्च करुन सेपरेट फीडर बसविण्यात आले. आणि सेपरेट फीडर बसविल्याने २ महिने लाईट सुरळीत होती. मात्र आता पावसाळा सुरु झाल्यानंतर आता पाऊस आला की २ तास, 3 तास, ४ तास रोज लाईट येणे जाणे करीत आहे. याचा आष्टीवासीयांना फटका बसुन राहीला आहे. आणि महावितरण विभागाचे अधिकारी बाहेरुन येणे जाणे करीत आहे. नावापुरते आष्टी येथे छोटीसी रुम घेऊन दाखविण्याकरीता ठेवलेली आहे.
तरी ४ दिवसात आष्टीची लाईट व्यवस्था सुरळीत न झाल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकण्यात येईल व दि. ०५/०७/२०२४ रोज शुक्रवारला आष्टी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आष्टी वासियांनी निवेदनातून दिला आहे तरी वरीष्ठ आधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे असेही निवेदनात म्हटले आहे तसे निवेदन देवेंद्रजी फडणविस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गडचिरोली,पोलीस अधिक्षक गडचिरोली,अधिक्षक अभियंता,गडचिरोली,तहसिलदार,चामोर्शी,उपकार्यकारी अभियंता चामोर्शी यांना पाठविण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देताना आष्टी शहरातील विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments