बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
29-06-2024
सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणा-या मुकडदमवर गुन्हा दाखल करून कारवाई करा
वंचित बहुजन आघाडीची जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे मागणी करून पोलिसात तक्रार
गडचिरोली : मनुष्यबळ पुरविणा-या एमव्हीजी कंपनी अंतर्गत गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुगणालयात मागिल तिन वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या २७ कामगारांची गेल्या आठ- दहा महिण्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुकडदम मनोहर सांडेकर हे छळणूक, पिळवणूक व शोषण करीत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा शल्य चिकीत्सकाकंडे करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सफाई कामगार म्हणून असलेल्या सर्व २७ कामगारांना मुकडदम सांडेकर आठ तासाच्या व्यतिरीक्त दोन -तिन सास ज्यादा काम करवून घेतात, स्वत:च्या घरचे काम करायला लावतात, नास्ता करायला सुद्धा वेळ देत नाही एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर दोन तिन दिवसाची अपसेंटी लावतात आणि या सर्व बाबीचा कामगारांनी विरोध केला किंवा मनाई केले तर महिला कामगारांना अश्लिल शिवीगाड करतात, मुलांनाही अश्र्लिल शिवीगाळ करतात व ईतकेच नाही तर कामावरून काढण्याची धमकी देतात, व शिवीगाळकरून धाकदपटाव करतात त्यामूळे या सर्व कामगांराची छळवणूक, पिळवणूक व शोषण होत आहे.
एमव्हीजी कपनीत तुम्हाला काम मिळवून देतो म्हणून अनेक सफाई कामगार कामगारांकडून एक लाख, सत्तर हजार, पन्नास हजार, तिस हजार प्रमाणे पैसे उकळलेले आहेत, त्यावरही समाधान झाले नसल्याने दर वर्षाला या सर्व कामगारांकडून मुकडदम सांडेकर हे पंधरा - विस हजार उकळण्याचा तगादा लावत आहेत त्यामूळे सर्व कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करीत आहेत.
सदर प्रकरणाच्या संबंधाने सर्व कामगारांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क करून हकिकत सांगितल्यामूळे वंचितच्या बाळू टेंभुर्णे, जी के बारसिंगे, कवडू दुधे यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांना न्याय मिळण्यासाठी व मुकडदमवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक व पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. संबंधीतांनी कामगारांना तात्काळ न्याय देण्याचे करावे व मुकडदम सांडेकरवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा ईशारा बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments