STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
25-06-2024
पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी
सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध
‘त्या‘कॉंग्रेस नेत्याविरूदध कारवाई करा - मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर
मूल येथील तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. याबाबत तीनही पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन सावली येथील तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. पुण्यनगरी मध्ये प्रसिदध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपविण्याची भाषा वापरली. एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे,अशा आशयाचा ठराव तीनही पत्रकार संघातर्फे घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसिलदार प्रांजली चीरडे आणि पोलिस निरिक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले. निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार , व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले,प्रा.शेखर प्यारमवार,प्रा.विजय गायकवाड,चंद्रकांत गेडाम, डॉ.कवठे,गोपाल रायपुरे,विजय कोरेवार,नासीर अन्सारी, गिरीश चीमुरकर,सुजित भसारकर,सौरव गोहने,प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.
बॉक्स
पत्रकार संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशी सुरू झालेली असून या बाबत दोन्ही पक्षा कडून त्यांचे बयान नोंदविलेले असून याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती ठाणेदार राजगुरू यांनी शिष्टमंडळाला दिली
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments