संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
25-06-2024
गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणच्या कार्यवाहित केला अवैध दारुसह एकुण 32,95,170/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी) यांच्या संयुक्त कार्यवाहित अतिसंवेदनशिल नैनगुंडम गावात अवैध दारुसह एकुण 12,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोस्टे अहेरी पथकाने केला वाहनासह एकुण 10,76,000/- अवैध दारुचा मुद्देमाल जप्त
अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पथकाने दोन विविध ठिकाणच्या कार्यवाहीत केला 9,93,170/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा जप्त
चार विविध गुन्ह्रात एकुण 05 आरोपीतांना घटनास्थळावरुन घेतले ताब्यात
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथील दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नविन क्लृप्त्या करीत असतात. माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल गावात दारु माफिया हे गोर गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करुन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांचे राहते घरात दारुची अवैध साठवणुक करुन ठेवत असल्याचा प्रकार गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने गडचिरोली पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे आहे की, अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरंचा हद्दीतील माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल नैनगुंडम या गावात काल दिनांक 23/06/2024 रोजी दुपारी 15.00 वा. दरम्यान गोपनिय बातमीदारांकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापुर येथे राहणारा ईसम नामे पुरुषोत्तम हनमलवार याने मौजा नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष भिमा सिडाम व गणेश सालय्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडाम याचे राहते घरी अवैधरित्या मोठ¬ा प्रमाणात देशी दारु व काळ्या गुळाची साठवणुक करुन ठेवली असल्याबाबतची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस पथकाचे दोन टिम व प्राणहीता अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करुन गोपनियरित्या प्रोव्ही रेड कार्यवाही करीता रवाना केले. सदर पोलीस पथकांनी मौजा नैनगु्ंडम गावातील संतोष सिडाम याचे राहते घरी जावुन प्रोव्ही रेड केली असता, त्याचे घरात देशी दारुच्या 142 पेट¬ा - किंमत 11,36,000 रुपये, काळ्या गुळाच्या 75 पेट¬ा - किंमत 90,000 रुपये, असा एकुण 12,26,000/- रुपयांचा अवैध मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. तसेच ईसम नामे संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्रातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा कार्यवाहीची चाहुल लागल्याने फरार झाल्याचे आढळुन आले. पोलीस पथकाद्वारे त्याचा शोध घेणे सुरु आहे.
यासोबतच चंद्रपूर जिल्ह्रातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारु तस्करी होत असल्याबाबच्या गोपनिय माहितीवरुन काल दिनांक 23/06/2024 रोजी अहेरी पोलीसांनी मौजा बोटलाचेरु गावाजवळ सापळा रचून संशयीत वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता, त्यात रॉयल स्टॅग विदेशी दारुच्या 06 पेट¬ा (विक्री किंमत 1,08,000/- रु.) रॉकेट संत्रा देशी दारुच्या 04 पेट¬ा (विक्री किंमत 32,000/-) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालक नामे मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने किशोर सुर्यभान डांगरे रा. आलापल्ली यास दारुचा पुरवठा करित असल्याचे सांगितले. आरोपींकडुन देशी विदेशी दारु, मोबाईल व टाटा व्हीस्टा वाहन क्र. एच एच 33 ए 3793 वाहनासह एकुण 4,10,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यांन्वये पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच आज दिनांक 24/06/2024 च्या रात्री पोस्टे अहेरी येथील पोलीस पथक नाईट गस्त ड¬ुटी करित असतांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच 38 एक्स 3055 वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता, वाहनातील चालक हा पोलीसांना पाहून पळुन गेला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट संत्रा देशी दारुच्या 68 पेट¬ा (विक्री किंमत 4,76,000/- रु.) मिळून आल्याने वाहनासह एकुण 10,76,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोस्टे अहेरी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच आज दिनांक 24/06/2024 रोजी गोपनिय बातमिदाराकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारु विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, 1) गंगाराम बकय्या नेरला व 2) नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली तह. अहेरी हे अवैध दारु विक्री करित असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून आयएमएफएल (क्ष्ग्क़ख्र्) विदेशी दारुचे 38 बॉक्स व देशी दारुच्या 20 पेट¬ा असे एकुण 58 बॉक्स अंदाजे किंमत 5,83,170/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अशा चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारुचा एकुण 33,22,980/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरच्या विविध कारवाया पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, पोनि. स्थागुशा श्री. उल्हास भुसारी, पोस्टे अहेरी प्रभारी अधिकारी पोनि. दशरथ वाघमोडे, सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि. राजू गवळी, पोउपनि. विजय सपकाळ, मपोउपनि. सरीता मरकाम, मपोउपनि. करुणा मोरे, परिपोउपनि. संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलीस जवानांनी केलेली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments