नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
24-06-2024
नवंनिर्वाचित खासदार डॉ, नामदेवराव किरसाण यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन
गावकऱ्यांचा वतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी परिसरातील मांडल्या समस्या
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला )परिसरातील अनेक गावे विकासापासून कोसोदूर आहेत. करीता आपल्या मार्फतीने राजाराम खांदला परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी राजाराम खांदला परिसरातील नागरिकांच्या मार्फतीने सामाजिक कार्यकर्ता मधुकर गोंगले यांनी नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसाण यांना अहेरी येथील सत्कार सोहळ्यात निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,
राजाराम येथील प्राथमिक आरोग्य पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यात यावा.व रुग्णवहीका उपलब्ध करून विविध रिक्तपदे भरण्यात यावी
राजाराम परिसरात जवळपास आठ ते नऊ गावे येत असून काही गावामध्ये पक्के रस्तेसुद्धा नाहीत.राजाराम येते आरोग्य पथक असून या परिसरात या ठिकाणी रुग्णवाहीका सुद्धा नाही.कोरेपल्ली पासून पक्के रस्ता नसून मोठमोठे दगडातून प्रवास करावा लागत असतो,व त्यामुळे एखाद्यावेळी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नायचे झाले तर रस्त्यावर दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही,
कमलापूर येते आरोग्य केंद्र आहे पण ते कोरेपल्ली पासून २० ते २५ किमीचा प्रवास करात जावा लागत असतो. आणि कोरेपल्ली येते लाखो रुपये खर्च करून उपकेंद्र बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी परिचारिका मुख्यालयी राहत नसून दहा पंधरा दिवसातून एक दोनदा येत असते.
राजाराम येते राष्टीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी राजाराम ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी. तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments