ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
22-06-2024
फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक
बल्लारपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केरला एक्स्प्रेसमधून बिहारकडे नेत असताना आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर युवकाला अटक केली. मोहम्मद मिया सलीम (३८) रा. बेलवा बिहार असे आरोपीचे नाव आहे.
२१ जुन ला नियंत्रण कक्ष, लोहमार्ग नागपूर येथुन फोनव्दारे जीआरपी पोलीस तसेच आरपीएफ माहिती मिळाली की केरला एक्स्प्रेस ने नाबलिक बालिकेला अपहरण करून बिहार ला घेऊन जात आहे. आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक यांनी दोन पथक तयार केले. त्यामध्ये शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे चाइल्ड लाईनचे क्षेत्रीय कार्यकर्ते व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त कार्यवाहीने, ट्रेन नं १२६२५ केरला एक्सप्रेसने अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात असलेली बालिका फरांना (नाव बदलेले ) (१२) रा.दुबीलीया, कुरवा माथीया जि. पश्चिम चंपारण (बिहार) हिला एक इसम अपहरण करून नेत असल्याची माहिती मिळाली.
नमुद ट्रेन मपोशि किर्ती मिश्रा, पोशि निलेश निकोडे, भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, चाईल्ड लाईन टीम, आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक व त्यांचे सहकारी तपास सुरू केला असता रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ३ वर ट्रेन आल्याने पुढील जनरल कोच मध्ये सदर बालिका मिळून आल्याने बालिकेस रे.पो. चौकी बल्हारशाह येथे आणुन हजर केले. विचारपूस केली असता बालिकेसंदर्भात पो स्टे. अंबलापुझा केरला येथे तक्रार दाखल असुन सदरचे पो.स्टे चा पोलीस स्टॉफ त्या मुलीला ताब्यात घेण्याकरीता येत आहे.
बाल कल्याण समिती, चंद्रपूर येथे दाखल करणे असल्याने नमुद बालिकेची वैद्यकिय तपासणी करून सदर बालिके विषयी माहिती तात्काळ अजय साखरकर, बाल संरक्षण अधिकारी आणि बाल कल्याण समिती, अध्यक्षा ऍड. क्षमा बासरकार यांना दिली व त्यांच्या मौखिक आदेशाने बालिकेला तात्पुता निवारा करिता सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर येथे ठेवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments