RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
20-06-2024
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
गडचिरोली, दि.20 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या बाबीकरीता शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तालुक्यात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंअंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस करीता अर्ज करण्याचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत आहे.
वरील निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खाते या बाब अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments