संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
19-06-2024
एक रुपयात पीक विमा : योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैची मुदत
गडचिरोली, दि.19 : खरीप हंगाम 2024 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. केवळ एक रुपया प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन, कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी 2025-26 हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी वीमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
विमा कंपन्यांचे नाव व टोल फ्री क्रमांक
गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001024088 हा टोल फ्री क्रमांक आहे.
*पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश*
हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या
कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.
आधारकार्ड, 7/12 उतारा, 8 अ, आधार संलग्न बॅक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments