STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
17-06-2024
गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत
अहेरी विधानसभा क्षेत्रात कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने कांग्रेसची ताकद वाढली!
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेची लढत बघायला मिळणार आहे.यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातही विधानसभेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सरसावले आहेत.राज्याचे अन्न पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुकन्या भाग्यश्री आत्राम यांनी विविध कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्या विधानसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. लोकसभेची उमेदवारी आपल्याला दिली तर विरोधकांचे पानीपत करू, असे विधान त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले होते.भाग्यश्री आत्राम या गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.त्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या सिनेट सदस्य आहेत.गेल्या काही दिवसांपासून त्यांनी विशेषत अहेरी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचा धडाका लावला आहे.अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भाग्यश्री आपल्या वडिलांसोबत सक्रिय सहभाग घेत आहेत. धर्मरावबाबा आत्राम हे आता चौथ्यांदा अहेरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहे. विशेष म्हणजे त्यांना चारही वेळेस मंत्रिपद मिळाले आहे.
अशात यावेळी आपल्या कन्येला विधानसभेची उमेदावारी देऊन ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले होते पण लोकसभेची तिकीट न मिळाल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम हेही विधानसभा निवडणुक लढवू शकतात असेही बोलले जात आहे.अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची लाइन लागली आहे.अनेक जण आमदारकीचे बाशिंग बांधून तयार आहेत.यात भाजपचे राजे अंबरीश आत्राम,दीपक आत्राम,हनमंतू मडावी यांचाही समावेश आहे.सध्या राज्यात भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार आहे.अशात अहेरी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी कुणाच्या वाट्याला येणार यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
काँग्रेसनेही गडचिरोली जिल्ह्यात लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे.गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे गावोगावी जाऊन बुथनिहाय कार्यक्रम घेत आहेत.‘आविस’चे अजय कंकडालवार यांचा आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम नुकातच झाला होता.कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी देऊन आपली वाटचाल लोकसभेकडे करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम सज्ज झाले होते.यासाठी त्यांनी वरिष्ठस्तरावरून फिल्डिंग लावली होती.पण अखेर भाजपाचे खासदार अशोक नेते यांना लोकसभेची तिकीट दिली पण लोकसभेत खासदार अशोक नेते यांचा पराभव झाला.
सध्या गडचिरोलीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे.अशात याठिकाणच्या जागांच्या वाटाघाटीत भाजपचा वरचष्मा राहणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.अजय कंकडालवार काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा काँग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांना या अहेरी विधानसभेतून अधिक मते मिळाली आहे.त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजय कंकडालवार हे कांग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे हे विधानसभा निवडणुकीनंतर कोण बाजी मारतील समजेल.पण गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस आले आणि भाजपचे मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत असल्याचे मतदारांना कडून बोलले जात आहे
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments