संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
16-06-2024
पोलीस भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकला
पोलीस भरतीत उतरलेल्या विद्यार्थ्यांचे आ.कृष्णा गजबे यांना निवेदन
आरमोरी-पोलीस भरती (२०२३-२४) शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसामुळे पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पोलीस भरतीत उतरणाऱ्या विद्यार्थ्यांनी आ.कृष्णा गजबे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस भरती (२०२३-२४) शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दि. १९ जून २०२४ पासून सुरू होणार असल्याने ही शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी. वरील शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळ्यात घेतल्यास जिल्ह्यात मुलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पावसात भरतीच्या ठिकाणी एक दिवस अगोदर जाणाऱ्या मुलांना झोपण्यासाठी जागा मिळणार नाही. कारण भरतीचे मुलं बॅनर टाकून रोडवरच आपली रात्र काढतात. गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील उमेदवारांना अतीवृष्टीमुळे येण्याजाण्याचे सर्व रस्ते व मार्ग बंद होतात. तसेच दळणवळणाचे साधन पुर्णपणे बंद असतात. १०० मीटर रनिंग चा सराव वर्षभर ग्राऊंडवर केल्यावर चाचणी परीक्षा रोडवर घेतल्यास परिणामी पाय गुंतून गुडघ्याला व पायाला कायमस्वरूपी दुखापत होऊ शकते.पावसात गोळा फेक करतांना गोळा कोरडा/सुखा राहणार नाही. परीणामी गोळा हातातून निसटेल किंवा दुखापत ही होऊ शकते.कधी पाऊस असेल तर कधी नसेल यामुळे मुलांना समान संधी मिळणार नाही. भेदभाव होईल आणि मार्क कमी जास्त येतील.तसेच
मैदानी चाचणी पावसात घेतल्यास मैदानावर चिखल झाल्यास १६०० मीटर रनिंग व १०० मीटर रनिंग धावणे जमणार नाही.
तसेच मैदानी चाचणी तयारी नुसार येणाऱ्या मार्कपेक्षा पावसात घेतल्यामुळे मुलांना खुप कमी मार्क येतील. तरी हा मुलांवर अन्याय असून पोलीस भरती सन २०२३-२४ ची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी.
विद्यार्थ्यांनी निवेदन दिल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेशी संपर्क करून या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले.
आ.कृष्णा गजबे यांना निवेदन देताना मंगेश पाटील, स्वप्नील हजारे,अक्षय मारभते, सौरभ गोंदोळे,पूरणानंद सोमजाल, अक्षय मोतेकर, धमेंद रामटेके,प्रशांत सोरते,आदीत्य ठवकर,निशाद वैरागडे,पवन लाकडे,मिथुन कांदोर,पंकज मडावी,सौरभ श्रीरामे,रामू जुरी,इक्सेन नॉनजाल,साहिल मने,अमोल मने,सौरभ सारवे,कुणाल सारवे,आशुतोष सारवे, पंकज सपाटे,संदीप हेडावू,राहुल हेडावू,रोशन मने,जयश्री सुपारे,पायल चौधरी,कल्याणी मेश्राम, सोनाली चंदनखेडे आत्माराम सोरते, रतन गोधोळे,यासहित शेकडो पोलीस भरतीत उतरलेले विद्यार्थी उपस्थित होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments