अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
14-06-2024
सतीनदीचा पूलाचे संतगती बांधकाम,ग्रामस्थांचा तालूक्याशी संपर्क तूटणार!?
सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यानी केली बांधकामाची पाहणी
कूरखेडा
तालूका मूख्यालयाशी मालेवाडा,कढोली पूराडा सह कूरखेडा -कोरची या राज्य महामार्गाला जोडणारा सतीनदीचा जूना पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे मात्र संतगतीने सूरू असलेले या बांधकामामूळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत ग्रामस्थांचा तालुका मूख्यालयाशी संपर्क तूटण्याचा धोका निर्माण झाला आहे या बांधकामाला यूद्ध स्तरावर गती प्रदान करण्याची व नागरीकाना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यानी केली आहे
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत ब्रम्हपूरी ते देवरी या महामार्गाचा बांधकामाला टप्या टप्याने सूरवात करण्यात आलेली आहे यावेळी महामार्ग दरम्यान असलेले नदी नाल्यावरील पूलांची क्षमता वृद्धि करीता जून्या लहान किंवा जिर्ण पूलाना तोडत नविन पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे या अंतर्गत कूरखेडा जवळून वाहणार्या जून्या पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम मागील ६ महिण्यापूर्वी सूरू करण्यात आले आहे मात्र संबंधित विभाग व कंत्राटदाराचा नियोजन शून्यते मूळे बांधकामाला गती नाही मागे काही तांत्रिक अडचणीमूळे अनेक दिवस बांधकामच ठप्प होते सद्या पूलाचा बाजूने कच्चा रपटा तयार करीत येथून वाहतूक सूरू आहे मात्र पावसाळ्यात हा रपटा पूराचा पाण्यात तग धरू शकणार नाही व या मार्गावरील वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्यास सतीनदीचा पलीकडील तालूक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुका मूख्यालयाशी तूटणार आहे, विद्यार्थाना तालुका मूख्यालयात असलेल्या शाळा महाविद्यालयात पोहचणे कठीन ठरणार आहे तसेच ग्रामस्थाना बाजारपेठ व कार्यालयीन कामाकरीता संपर्क तूटल्याने मोठी अडचण होणार आहे या मार्गावरील बस वाहतूक सूद्धा ठप्प पडणार आहे या मार्गाला पर्यायी असलेला मार्ग सूद्धा लांब अंतराचा व अरूंद असल्याने त्या मार्गाने जड वाहतूक शक्य होणार नाही त्यामूळे येथून कोरची व पूढे देवरी तसेच छत्तीसगढ़ कडे जाणारी वाहतूक सूद्धा ठप्प बंद होणार आहे या पूलाचा बांधकाम स्थळाला आज सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील नाट वडसा माजी प.स. सभापती परसराम टिकले यूवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम यानी भेट देत पाहणी केली यावेळी येथे मोजक्या मजूराकडून संतगतीने बांधकाम सूरू असल्याचे निदर्शनात आले त्यामूळे संबंधित विभागाने बांधकामाला गती देत यूद्ध स्तरावर बांधकाम करावे व संभाव्य उदभवणार्या परीस्थीतून तालूका वासीयाना दिलासा द्यावा अशी मागणी त्यानी केली आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments