संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
13-06-2024
मार्कडेश्र्वर मंदिराचे रघडलेले जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करा - खासदार डॉ नामदेव किरसान
भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत निर्देश
आढावा बैठकीला संत मुरलीधर महाराज यांची उपस्थिती
चामोर्शी:-
विदर्भाचे काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडा नगरी येथे संत मुरलीधर महाराज हरणघाट पीठ यांनी मार्कंडेश्वराचे जीर्णोदवाराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे या मागणीसाठी उपोषण केले होते आणि थातूर-मातूर आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले. तेव्हापासून आत्तापर्यंत दोन टक्के सुद्धा जीर्णोद्वाराचे बांधकाम झालेले नाही.ही माहिती नवनिर्वाचित खासदार नामदेवराव किरसाण यांच्या लक्षात आणून देताच खासदारांनी त्वरित पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थितीत १२ जून रोजी मार्कडा आढावा बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत खासदार डॉ नामदेव किरसान यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्वरित जिर्णोद्धार काम सुरू करण्याचे निर्देश दिले
१२ जून रोजी मार्क डा येथे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला माजी खासदार मारोतराव कोवासे,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, संत मुरलीधर महाराज, महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव विश्वजीत कोवांसे , राजेश ठाकुर,नगरसेवक नितीन वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, माजी जी.प.सदस्य कविता भगत, नगर सेवक सुमेध तुरे , जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,, अशोक पोरेडीवांर, कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, संजय वडेट्टीवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले अमर मोगरे, चंदू मस्ककोले, तेजस कोंडेकर, माजी प.स. सदस्य धर्मशिला साहारे, मुखरू शेंडे ,मनोज हेजीब यांच्यासह व परिसरातील बाबांचे भक्त गण आणि भारतीय पुरातत्व खात्याचे अधिक्षण पुरतस्तविध अरुण मल्लिक , संरक्षण सहाय्यक शुभम कोरे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ नामदेव किरसान यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिर्णोद्धार बांधकाम बंद का पडले, ते सुरू केव्हा करणार आदी विविध प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कार्यप्रणालीवर नापसंती व्यक्त करत हे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले
त्यावेळी एक महिन्याची मुदत द्या आम्ही बांधकाम पूर्ण होई पर्यंत काम बंद पडू देणार नाही, असे आश्वासन पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी दिली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments