निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
12-06-2024
मालतीच्या कविता आदिवासी जीवनाच्या वेध घेणाऱ्या-ना.गो. थुटे
गडचिरोली : झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने मालती सेमले यांच्या 'पाना तोडणीच्या मोसमात' या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ .निलकांत कुलसंगे ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी उपनिर्देशक गीत व नाट्य, केंद्रीय सांस्कृतिक विभाग दिल्ली यांचे हस्ते तर 'गोष्टी रान पाखरांच्या' या बाल कथा संग्रहाचे प्रकाशन वरोऱा येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा झाडी बोली चळवळीचे आधारवड ना.गो. थुटे यांचे हस्ते पत्रकार भवन गडचिरोली येथे थाटात पार पडले. मालती सेमले यांच्या कविता आदिवासी जीवन दर्शन घडविणाऱ्याच नसून त्या समाजाला दिशा दर्शक आहेत आहेत असा सर्वसाधारण सूर मान्यवरांच्या भाषणातून या प्रसंगी व्यक्त झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे यांनी भुषविले होते.त्यांनी मालती यांनी संग्रहात बालपणातील आदिवासी संस्कृतीचे जगलेले संपूर्ण जीवन मांडलेले असून तेच आजच्या समाजाला पोषक आहे. असे प्रतिपादन केले.
तर मालतीच्या स्त्री जीवनावरील आदिवासी कवितांची दखल सर्वत्र घेतली जाईल. इतका सखोल मतितार्थ त्यांच्या कविता व कथेत आहे. असा आशावाद डॉ. निलकांत कुलसंगे यांनी प्रगट केला. 'पाना तोडणीच्या मोसमात' या कवितासंग्रहावर कवी मोहन शिरसाट , वाशिम यांनी भाष्य केले तर गोष्टी रान पाखरांच्या या बालकथा संग्रहावर कवी प्रदीप देशमुख यांनी भाष्य केले. या प्रसंगी व्यासपीठावर चंद्रपूरचे कवी इरफान शेख ,३१वे झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे , गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोतरावजी इचोडकर, नाटककार चुडाराम बल्लारपुरे प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान होते.या पाहुण्यांनी मनोगतातून दोन्ही संग्रहास शुभेच्छा दिल्या.कवयित्री मालती सेमले यांनी सुध्दा मनोगतातून दोन्ही संग्रहाच्या निर्मिती बद्यल माहिती दिली.प्रास्ताविकेतून सचिव कमलेश झाडे यांनी मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन संजीव बोरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपेंद्र रोहणकर यांनी मानले. याच कार्यक्रमात मंडळाचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून संजीव बोरकर,संग्रहाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ रेखाटणारे भारत सलाम, सुदर्शन बारापात्रे यांना
स्मृतीचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.,कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर सेमले,डॉ. सागर सेमले,पराग सेमले, आणि मंडळाचे प्रा. विनायक धानोरकर, मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे, पुरूषोत्तम ठाकरे, डॉ. प्रविण किलनाके,वर्षा पडघन,
प्रतिक्षा कोडापे,प्रेमिला अलोने ईत्यादीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला वरोरा, चंद्रपूर , भद्रावती येथील झाडीबोली मंडळाचे कवी तसेच स्थानिक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments