संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
22-05-2024
मौजा कोंढाळा ता. देसाईगंज येथील हत्याकांडातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व एकुण 2 लाख 75,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली
* मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दि. 24/08/2017 रोजी सायंकाळी तान्हापोळ्याच्या दिवशी 07.30 वा. ते 07.45 वा. च्या सुमारास मयत दिनेश दिगांबर झिलपे, वय 37 वर्षे रा. कोंढाळा याचा भर चौकात आरोपी शामराव सोमा अलोने त्याचा मुलगा आरोपी विनायक शामराव अलोने व आरोपी राजु ढोरे सर्व राहणार कोंढाळा यांनी गोपाल कसारे यांच्या पानठेल्याजवळ लोखंडी रॉड व पावड्याने मारुन निर्घुणपणे हत्या करुन मयताचे प्रेत हे कोंढाळा ते रवि रोडवर जंगलामध्ये फेकुन दिले. याबाबत मयताचे वडील दिगंाबर झिलपे यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अप.क्र. 367/2017 कलम 302, 201, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना दि. 27/08/2017 रोजी अटक करण्यात आली. तपासामध्ये असे निदर्शनास आले की, मयत दिनेश यास दारुचे व्यसन होते. आरोपी शामराव अलोने याने त्याच्या दुकानासमोर एक वर्षापुर्वी मयत दिनेश याच्या पायावर व डोक्यावर कुहाडीने वार केला होता. परंतु त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोपी शामराव याने खर्च केला होता. त्यामुळे त्याबाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. परंतु काही दिवसाने आरोपी शामराव व त्याचा मुलगा विनायक हे पैशाची मागणी मयताकडे करु लागले. त्यावरुन जुन्या रागावरुन सदरचे हत्याकांड घडुन आले. घटनेच्या दिवशी मयताची पत्नी निता दिनेश झिलपे ही मयताला चौकातुन घरी आणण्यासाठी गेली असता, तिला मयताला तिन्ही आरोपी यांनी पावड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत असल्याचे दिसले. त्याबाबत तिने तिचे सासरे दिगांबर झिलपे यांना माहिती दिली.
त्यावरुन फोनद्वारे पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळावर मयताचे प्रेत आढळुन आले नाही. परंतु मयताचे चप्पल, मोबाईल व रक्ताने माखलेली जागा दिसुन आली. तपासादरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर मयताचे प्रेत आरोपी शामराव यांनी लपवुन ठेवलेली जागा दाखविली व मयताचे प्रेत ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळुन आले. तसेच लोखंडी रॉड व पावड्यावर रक्ताचे डाग आढळुन आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. त्यावरुन सेशन केस क्र. 87/2017 नुसार खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन आज दिनांक 21/05/2024 रोजी आरोपी शामराव अलोने, वय 57 वर्षे व राजु ढोरे, वय 36 वर्षे दोन्ही रा. कोंढाळा यांना कलम 302, 201, 34 भादवी अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 1 लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी विनायक अलोने, वय 37 वर्षे, यास कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेप व 75,000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रु. 2 लाख 75,000 हजार मयताची विधवा पत्नी निता दिनेश झिलपे हिला देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.
सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान व सहा. सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. शैलेश काळे, सपोनि./अतुल श्रावन तवाडे, पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments