CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
12-05-2024
आष्टी पोलीसांनी चारचाकी वाहनासह पकडली लाखो रुपयाची दारु
दिनांक. ११/०५/२०२४ रोजी गोपनिय सुआव्दारे माहिती प्राप्त झाली की मौजा गोडंपिपरी ते घाटकुर मार्गानी एक चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ ए.एच.५५५६ स्कॉरपिओ या वाहनाने देशी व विदेशी दारूची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदाराकडुन खावीशिर खबर मिळाल्याने पोस्टे स्टॉफ यांनी नमुद वाहनास मौजा आष्टी जवळील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय च्या समोरील रोडवर आष्टीते आलापल्ली कडे जाणा-या मार्गावर पाळत ठेवून बसलो असता एक चारचाकी वाहन संशयीतरित्या भरधाव वेगाने येताना दिसल्याने सदर वाहनास हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक यांनी जाणीवपूर्वक सदरचे वाहन नाकेबंदी करीत असलेल्या कर्मचा-याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न कर्मचा-यास दुखापत करुन शिताफीने आपले ताब्यातील वाहन मागे वळवुन मौजा आष्टी येथील आंबेडकर चौकातून वळवुन चामोर्शी मार्गे निसटून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोस्टे आष्टी येथील अधिकारी व कर्मचा- यानी सदर वाहनाचा शिताफीने पाठलाग करून सदर वाहनास मौजा चामोर्शी येथील सार्वजनीक बांधकाम विभाग चामोशीं यांचे कार्यालया समोरील महामार्ग क्रमांक ३५३ सी. या वरती सदर वाहनास चामोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाठलाग करीत असलेले पोस्टे आष्टी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर वाहनास थांबवून चेक केले असता १) पांढ-या रंगाच्या खर्डाचे ०८ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ०२ लिटर मापाच्या इम्पेरियल ब्लु कंपनिच्या ०६ बॉटल असे एकुण ४८ बॉटला प्रती बॉटल विक्री किमंत २,०००/- रुपये प्रमाणे एकुण किंमत ९६,०००/- रुपयाचा मुद्देमाल २) खाकी रंगाच्या खांचे ४० बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ९० मि.ली. मापाच्या रॉकेट देशीदारु संत्रा कंपनिच्या १०० निपा एकुण ४००० निपा प्रतिनिप विक्री किमंत ८०/- रुपये प्रमाणे एकूण किंमत ३,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल ३) एक जुनी वापरती पांढ-या रंगाची स्कॉरपिओ वाहन क्रमांक एम.एच. ३२ ए.एच.५५५६ एकुण किंमत १५,०००,००/- ४) दोन वापरते जुने विचो कंपनिचे मोचाईल एकूण किंमत १००००/- रुपये असा एकूण १९,२६,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. सदर चाहनातील इसम नामे १) नितेश वशिष्ट चंदनखेडे वय ३४ वर्ष व्यवसाय चालक रा. नागसेननगर भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपुर २) निखील राजु क्षिरसागर वय २१ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. गवराळा गणपती वार्ड भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपुर या विरुध्द पोलीस स्टेशन आष्टी अप क्रमांक ७२/२०२४ कलम ३०७,३४ भादवी, सहकलम ६५ (अ),८३ मदाका, १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखलकरुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे पोस्टे आष्टी हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल साो. गडचिरोली मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चिंता साो. गडचिरोली मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश साो. अहेरी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमर मोहीते सा. अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक श्री. विशाल प्र. काळे यांचे नेतृत्यात पोलीस उपनिरीक्षक श्री. दयाल मंडल, पोउपनि अतुल तराळे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास मानकर, पोशि/३४१२ अतुलतोडासे, पोशि/३३१५ संतोष नागुलवार, पोशि/५६६१ मुनेश रायसिडाम, पोशि/५८४६ पराग राजुरकर, पोशि/ ५६७५ मेदाळे यांनी सदर कामगीरी यशस्वीरीत्या पार पाडली
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments