अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
05-05-2024
नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार
तालुका प्रतिनिधी चामोर्शी -
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै. येथील 2 विद्यार्थ्यांची नुकत्याच पार पडलेल्या नवोदय प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात 8 विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. याचेच औचित्य साधून दिनांक 04 -05-2024 रोज सोमवारला जि.प. केंद्र शाळा कुनघाडा रै. येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोतम सातपुते उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आदरणीय रा. णा. सातपुते सर, केंद्रप्रमुख गोमासे सर, किरण कुकडे, रोशन दुधबळे, गिरीधर कुनघाडकर मुख्याध्यापक तावाडे सर, प. शि. कु. गीता शेंडे, जगदीश वैरागडे, कविता कुनघाडकर, वीणा दुधे व लर्निंग लिंक फाऊंडेशन चे कार्यकर्ते उज्ज्वल गोरे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवोदय विद्यालय येथील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल यश संदिप बारसागडे, हिमांशू नितीन कुनघाडकर, या दोन विदयार्थ्यांचा भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी मारणाऱ्या यश संदीप बारसागडे, हिमांशू नितीन कुनघाडकर, संघर्ष अशोक दुधे, आयुष पुरुषोतम सातपुते, गोविंद किरण कुकडे , वेदांत गिरीधर कुनघाडकर , निरंजन सत्यविजय भांडेकर, आदित्य रमेश वासेकर या विद्यार्थ्यांचा भेटवसू व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मार्गदर्शन करतांना सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रा.णा. सर यांनी कुनघाडा येथील शाळेतील शिक्षक, शा. व्य. सामिती, पालक यांचे योगदान फार महत्वपूर्ण आहे, म्हणूनच आज जिल्हयात जास्तीत - जास्त येथील विद्यार्था गुणवंत ठरले आहेत. केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे म्हणाले कि, छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच यशाची वाट चाल करता येते, विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधीच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य सोडू नये हा बोध आपण सर्व विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यातून घ्यावा. अभ्यासाचे आणि कष्टाचे फळ गोड असते. असेच प्रयत्न करीत राहावे. याप्रसंगी मुख्याध्यापक तावाडे किरण कुकडे यांनी समयोचित भाषणे झाली. नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षा चे मार्गदर्शक शिक्षक गुरुदास सोनटक्के, विजय दुधबावरे, कु. गीता शेंडे या शिक्षकांचाही शाळेतर्फे तसेच पालकांतर्फे भेटवस्तू-वस्त्र पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या देखण्या सोहळ्याचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षिका कु.गीता शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक प्रमोद बोरसरे यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्य पालक माताभगिनी विद्यार्थी उपस्थित होते.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments