RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
05-05-2024
कुनघाडा (रै.) जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेचा सत्कार
*मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केला गौरव.
* यश हे परिश्रमपूर्वक वांरवार केलेल्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे -
आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिपादन
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकाच शाळेचे 8 विद्यार्थी पात्र होऊन मिळालेल्या यशाबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै.) शाळेचा सत्कार करण्यात आला. 2 मे 2024 रोजी मुख्याध्यापक आढावा तथा प्रेरणा कार्यशाळा गडचिरोली येथील कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आयुषी सिंह, डायट प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी (माध्य.) भुसे साहेब, उपशिक्षणाधिकारी ( प्राथ) विवेक नाकाडे, उप.माध्य. शिक्षणाधिकारी अमसिंग गेडाम साहेब, निरंतर शिक्षणाधिकारी गोंगले साहेब, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता विनीत मत्ते, गडचिरोली पं. स. गटशिक्षणाधिकारी परसा मॅडम, गटशिक्षणाधिकारी चामोर्शी पं.स. गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के व चामोर्शी व मुलचेरा पं.स. अंतर्गत शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत केंद्रशाळा कुनघाडा रै. च्या वतीने केंद्रप्रमुख गुरदास गोमासे व पदवीधर शिक्षिका कु. गीता शेंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरात इयत्ता पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा (रै.) येथील एकाच शाळेतील ८ विद्यार्थी पात्र ठरून जिल्ह्यात आपल्या नावाची मोहर उमटवली. शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक नवराज तावडे, पदवीधर शिक्षिका गीता शेंडे वर्गशिक्षक गुरुदास सोनटक्के, मार्गदर्शक शिक्षक विजय दुधबावरे, विषय शिक्षक प्रमोद बोरसरे,प्राथ शिक्षक अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, अभिषेक लोखंडे यांचे सहकार्य आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम सातपूते, गटविकास अधिकारी सागर पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांनी शाळेचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments