अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
02-05-2024
गडचिरोली जिल्ह्यात एस. टि. बसच्या वाहतुकीचे वाजले तीन तेरा
नव्या बसेस उपलब्ध करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
गडचिरोली
गडचिरोली जिल्हयात एस. टी. वाहतुकीचे तीन तेरा वाजले असुन अपुऱ्या व भंगार बसेसमुळे नागरिकांना प्रवास करताना गैरसोय व मनस्ताप सहन करावा लागत आहे , जिह्यातील मुलचेरा, भामरागड, सिरोंचा असरअल्ली, कुरखेडा या दुर्गम भागात अजूनही बससेवा नियमित पणे पोहोचली नाही.गडचिरोली आगारातून प्रवशाना जाण्यासाठी चार तास वाट पहावी लागते, भंगार बसेस मुळे अनेकदा बस अर्ध्या रस्त्यातच अडकून पडल्याच्या घटना रोजच होत आहे त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कॉल सेंटर बंद असल्यामुळें प्रवाशांना बस किती वाजता सुटणार आहे याची माहिती सुध्दा मिळत नाही. बस सोडण्याचे नियोजन खाजगी वाहने सोडल्या प्रमाणे करण्यात येत आहे याबाबत आगार प्रमुखांना कळविले तर ते नादुरुस्त बस, व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याची गाऱ्हाणे सांगतात.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असताना जिल्ह्याला विकसित करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी असल्याने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोलमडलेल्या एस टी बसेस ची समस्या दुर करुन गडचिरोली जिह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी मुख्यमंत्री व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments