STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
01-05-2024
शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा कुनघाडा रै येथील 8 विद्यार्थ्यांची गरुडझेप
चामोर्शी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा रै. येथील 8 विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यामध्ये यश संदिप बारसागडे, हिमाशू नितिन कुनघाडकर, आयुष पुरुषोत्तम सातपुते, गोविंद किरण कुकडे, संघर्ष अशोक दुधे, वेदांत गिरिधर कुनघाडकर, निरंजन सत्यविजय भांडेकर, आदित्य रमेश वासेकर याच समावेश आहे. केंद्र शाळेने २०१९ पासून नवोदय परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेतही उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. सत्राच्या सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी, ज्यादा सराव, रात्र कालीन वर्ग , गृहभेटी, पुरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी, प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता पालकांचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय उच्च श्रेणी मुख्याध्यापक तावडे सर, मार्गदर्शक शिक्षक विजय दुधबावरे, गुरुदास सोनटक्के, कु. गीता शेंडे, प्रमोद बोरसरे, अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, अभिषेक लोखंडे सर यांना दिले आहे. गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, सर्व पदाधिकारी व पालकांनी मुलांच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments