संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
27-04-2024
'त्या' रानटी हत्तीचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलन करु
स्वराज्य फाऊंडेशनचा वनविभागाला इशारा
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा, आलापल्ली नंतर आता भामरागड वनविभागात रानटी हत्तीने एन्ट्री केला असून धुमाकूळ माजवला आहे. त्यामुळे परिसरात रानटी हत्तीची दहशत निर्माण झाली आहे.पुन्हा कोणतीही अनुचित घटना घडण्याच्या पूर्वी वनविभागाने रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली आहे. रानटी हत्तीचा बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.
23 एप्रिल ला रात्रोच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. 25 एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कियर गावात एका एसमाचा रानटी हत्तीने पायाने तुडवून ठार केले आणि हिदुर येथील तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे त्यातील एका जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे गावालगतच्या जंगलात त्या रानटी हत्तीचा मुक्तसंचार सुरु असून याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावाच्या अगदी नजीक रानटी हत्ती आला असल्याने नागरिक भयभीत झाले असून पुन्हा कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने दखल घेत रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली असून तसे न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments